अनुबंध बंधनाचे. - भाग 52

  • 516
  • 177

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५२ )प्रेम : अंजु.....! मला असं वाटतंय की, चुक तुझी नव्हतीच कधीच...! खरं तर चुक माझी होती. मी माझ्या मर्यादा ओळखायला हव्या होत्या. खरच खुप चुकलोय मी, आणि माझ्या या चुकीची शिक्षा तुला आणि तुझ्या फॅमिलीला पण भोगायला लागत आहे. मी जर तेव्हाच स्वतःला थांबवलं असतं तर कदाचित ही वेळ आली नसती. माझ्यामुळे सर्वांना त्रास होतोय. माफ कर मला. पण एक गोष्ट खरी आहे. तु तुझ्या परिवारासाठी काय आहेस याची कल्पना कदाचित तुला नाही.  माझ्यासाठी फक्त एक गोष्ट करशील...! कधीही तुझ्या मॉम डॅड ना दुखवू नको. तु सर्वस्व आहेस त्यांच्यासाठी. हे विसरू नकोस. कारण जगात आईवडिलांसारखे प्रेम आपल्यावर कोणीच