त्या रात्री लग्न होतं

(192)
  • 13.2k
  • 5.4k

"धप्प.. त्या रात्रीच्या शांततेला भन्ग करणारा आवाज झाला.. एखादी जड गोणी पडल्यासारखा.. पण.. अगदी तसाच नाही.. सोबत ओला चिखल पडल्याची संभावना देणारा.. आणि.. सोबत कटकन काही मोडलंय असंही दर्शवणारा..."बंगल्याच्या दुसऱ्या मजल्याच्या खिडकीतून रक्तरंजीत असं शव  तीस फूट खाली बंगल्याच्या बागेत पडल. त्याचाच तो आवाज होता.. खाली पडल्यावर शरीरातल्या सांगड्याची असेम्बली तुटली असेल.. त्याचं मान्स त्वचा फुटून बाहेर आलं असेल त्याचाही चिखलाच्या राळासारखा आवाज... नंतर.. नंतर एक थंड हवेचा पांढरा झोत त्याच खिडकीतून बाहेर गेला. बंगल्यात आता फक्त.. फक्त एका मुलीच्या श्वासाचा आवाज येत होता.. भेदरलेला श्वास.. शून्यात हरवलेल्या नजरेने डोळे मोठे करुन बघत, ती मुलगी थरथरत कोपऱ्यात बसली होती.. आजचा दिवस