क्षितिजापार

  • 147

"खबलक खबलक घोडोबा घोड्यावर बसले लाडोबा लाडोबाचे लाड कलतंय कोण?दादाशिवाय आहेच कोण?खबलक खबलक..."खाडकन विजेचा आवाज आसमंतात दुमदूमला आणि आनंदची झोप स्वतःच्याच स्वप्नाच्या आवाजाने दचकून मोडली. तो नेहमीसारखा उठून बसला. ते जीवघेणं स्वप्नं त्याची झोप कितीदा कुरतडायचं?.. त्याचं त्यालाही आठवत नव्हतं आता. पहाट झालेली होती. अजून चारेक तासांनी सकाळी तो तिथून निघणार होता. ती जागा.. जिथे त्याने आयुष्यातली महत्वाची अशी घडवणूकीची वर्षे घालवली. गेली सात वर्षे तो रिमांड होम मध्यें होता.पाच वर्ष लहानपणी केलेल्या गुन्ह्यामुळे आणि पुढली दोन वर्ष स्वतःच्या सोज्वळ, कष्टाळू आणि लाघवी स्वभावाने सर्वाना जिंकून घेत त्याने तिथेच दोन वर्ष नोकरीं करत व्यतित केली. नोकरीं कसली एक प्रकारची समाजसेवाच करत होता तो.