कोंदण पर्व एक - भाग 10

(110)
  • 10.4k
  • 3.2k

सुनीचे आईबाबा संध्याकाळी घरी आले होते. काकूंनी मला जवळ घेत माझं खूप कौतुक केलं. " मला तुझ्याबद्दल जे वाटत होतं तू अगदी तसाच आहेस. नेहमी अपेक्षाना खरा उतरतोस तू.. आपल्या या गुणी पोरांना दृष्ट लागायला नको कोणाची." माझ्यावर मायेची उधळण करत त्या म्हणाल्या. सुनीचं पण माझ्या आईबाबांनी कौतुक केलं. माझ्या पाठीशी नेहमी असण्याबद्दल आधीच त्यांना तिचं कौतुक होतं. तिचा माझ्यावरचा जीव माझ्या आईबाबांना चांगलाच माहित होता.बाबांनी मला त्याचवेळी surprize दिलं. नवी कोरी त्याकाळी खूप फेमस असणारी "hercules MTB Canon barrel" cycle दुकान वाल्याने आमच्या घरी आणली. मी त्यांना मागितली नव्हती. मी म्हणालो पण तसं त्यांना.पण बाबा म्हणाले, " तू मागत काहीच नाहीस.