सहामाही परीक्षा येऊ घातल्या होत्या. सुनी आणि मी अभ्यासाला लागलो होतो. Time table मिळाले तसे सुनी आणि मी गडप झालो. दोघे आपल्या आपल्या घरी अभ्यासात बुडालो. ह्यावेळी माझा आलेख मला चढता ठेवायचा होता. त्यामुळे मी शाळेतून आलो कि अभ्यासात असायचो.. सुनी आणि माझी धावती भेट व्हायची.तिने मला सांगून ठेवलं होतं."जाडू मन लावून अभ्यास कर हा.. यावेळी आणखी पुढे यायला हवाय तू."बस एवढं प्रोत्साहन मला पुरे होतं. बीजगणित आणि भूमिती दोघे माझे मित्र झाले होते तर, इंग्लिश माझं विना अभ्यास चांगलं होतं. व्याकरण करुन गेलं कि पुरे व्हायचं. विज्ञान आणि समाजशास्त्र सोबती होते.. कारण नुसतीच वर्तमानपत्र नाही तर वैज्ञानिक मासिके.. जगाच्या