आर्या आवाज देताच, श्वेता लगेचच आतमध्ये जाते . अनुराग थोडा नाराज होऊन श्वेता मागोमाग आतमध्ये जातो.आर्याला भूक लागलेली असते पण श्वेता येण्याआधीच आजीने तिला जवळ घेऊन काहीतरी खाऊ भरवायला सुरुवात केलेली होती. श्वेताने जवळ जाऊन बघितले तर आजी आर्याला पेज देत होती. श्वेता हळूच म्हणाली, आई तुम्हाला काही तरी विचारायच होतं …( हळू आवाजात बोलता बोलता, अर्धवट बोलणं सोडून ती शांत बसली) ! आजी म्हणाल्या, “काय झालं? अशी अर्धवट बोलत शांत का झालीस ?”श्वेता तरीही विचारात होती, कसं बोलू ? पण आजी ने तिला खांद्यावर हात ठेवून, डोळ्यांनी खुणावले ! मग ती म्हणाली, तुम्ही प्रिन्सिबद्दल पुढे काय विचार