थंड झाल्यार खावचा भाग २ पार्वतीची नड ओळखून भटणीने आपल्या गोठ्यातली हत्ती सारखी दांडगी ,वेळेला अडीच शेर दूध देणारी ढवळी गाय तिने सोडून दिली नी रत्नूला बजावले, “ सोयन् बाळगलस तर तुजो झील अन्नाक लागासर दुद काय कमी पडणार नाय. कासेकक पाडो हा.... तीन चार वर्सान जोताक उजवता येयत्... धारेरच्या पडणात आयन, बिवळे,हसाणी नी धमणी हत.... रोज येंगाटभर हिरवोपालो घतलस तर गाय येक्या धारेन् दुद देयत नी पाडोदुकु उजवारात. सोयन् बाळगलस तर माज्या ढवळीचा जायपा तुजो गोटो भरीत.....”