कोंदण पर्व एक - भाग 7

  • 651
  • 150

सदावर्ते विद्यालयाच्या प्राथमिक विभागासमोर छोट्या व्हरांड्यात मला सुनी दिसली होती. बालवाडीचा पहिलाच दिवस आणि माझी आई मला शाळेत घेऊन आली. समोर पाहतोय तर अंगणात खेळत दिवस काढलेले आम्ही बालमित्र मैत्रीण एकाच शाळेत असण्याचा उलगडा मला झालेला. मी खुश होऊन ओरडलो होतो."थुनी..!! ""जालू..ss!!" तिने मला बघताच तिचे डोळे चमकले आणि तीही हसून टाळ्या पिटत आनंदाने ओरडली.आम्ही दोघांनी धावत येऊन एकमेकांना घट्ट मिठी मारली होती. आमच्या आया आमच्याकडे पाहून खूप हसत होत्या. वर्ग सुरु झाला. एवढं स्पष्ट आठवत नाही आता, मात्र काही वेळाने सुनी मला खिडकीच्या गजात तोंड खुपसून उभी असलेली दिसली. जवळ जाऊन बघितलं तर डोळे मिटून रडत होती. गालावरचे ओघळ तिच्या