कोंदण पर्व एक - भाग 6

  • 975
  • 289

क्लास सुटला होता. मी आणि सुनी चालत थोडंच पुढं आलो तसं आम्हाला नेहमीची त्या सचिनच्या सायकलीची खडखड ऐकू आली." आलाच!!" सुनी माझ्याकडे बघत हसत म्हणाली." एकदम वेळेवर हा सचिन!! अजिबात चुकत नाहीस तू!" सुनी म्हणाली.तो जवळ येऊन थांबला. सुनीने ने तिच्या बॅग मधून वही काढली आणि त्याच्यासमोर धरली." thanks गं.. तुझ्यामुळे खूप सोपं झालंय मला हे सगळं. " तो म्हणाला. त्याने वही घेण्यासाठी हात पुढे केलाच होता.तेवढ्यात मला काही सुचलं.. अचानक..."मी आज काहीच लिहीलं नाहीये क्लास मध्ये. सुने तुझी वही हवीये मला आज." छातीतल्या वाढलेल्या धडधडीला दुर्लक्षित करत मी त्या दोघांच्यात निर्लज्ज होत नाक खुपसलं.दोघे चमकून माझ्याकडे बघू लागले. मग