नमनपूरच्या महाराणी शलाकादेवी अंगावर अगणित जखमा घेऊन दोन्ही हातात खडग पेलवत उभ्या होत्या. त्यांच्या उरलेल्या मोजक्याच सैन्यासमोर जवळ जवळ दहा पट आणखी सैन्यबळ आक्रमन करायला सज्ज होतं. बलाढ्य शत्रू सैन्याची अर्धी संख्या संपवण्यात शलाकादेवींचं नव्वद टक्के सैन्य विरगती मिळवून संपलं होतं. आपल्या राणीच्या शौर्याने स्फूरण चढलेले सैनिक पाय घट्ट रोवून त्यांच्या मागे उभे होते. सगळीकडे वीर सैनिकांच्या देहांचा खच पडला होता. त्या कलेवरांच्या सानिध्यात इतर भावनांना श्वास नव्हता. तिथं होती ती फक्त निष्ठुर कर्तव्य भावना.शलाकादेवीनी सुंदर शासन करतं सुराज्य बनवलेल्या नमनपूरची शत्रू राज्यासमोर संपूर्ण शरणागती आणि अन्याय्य कर वसुलीचा अधिकार शलाकादेवीनी अमान्य केला होता. स्वतःच्या प्रजेला जुलमी राजवटीच्या खाली आणणे