"बायजा तू लय भाबडी आशा ठिवती बघ. तुझा धाकला तुला खायाला कोर चतकोर भाकर देतो ते बघ कि.. तुला पडत्यात बंगल्याची सप्नं... आगं तुझ्या थोरल्यानी तुझं नाव टाकून जमाना झाला. कशाला तुला बोलावतील बंगल्यात ऱ्हायला." तिच्या गावातली तिच्या वयाची अनसुया बायजाच्या दारात बसून रडणाऱ्या बायजाला सांगत होती.तिच्या थोरल्या मुलाचा मुलगा तिचा नातू अभिजित मोठा ऑफिसर झाला होता. शहरात मोठा बंगला बांधला होता त्याने. असं कळलं होतं तिला. लहानपणी गावाकडेच जन्मलेल्या आणि दहा वर्ष आजीसोबत राहिलेल्या आपल्या आजीलातो म्हणायचा,"आज्जे!! मी नां मोठा ऑफिसर व्हणार आणि शहरात बंगला बांधणार." वीस वर्षानी त्याने त्याचे शब्द खरे केले होते. वीस वर्षापूर्वी बायजाचा नवरा वारल्यावर तिच्या