"ऐक ना ए झाम्या...अरे किती वेळ झालं बघतोय आपण.. यडी आहे रे ती.. तिचा बाप काय करू शकणार नाय.. हे बघ ही ट्रेन किरीटवाडीला थांबते.. हे दोघे उतरणारेत.. ऐकलं मी मघाशी...आपली गाडी हाय कि तिथंच.. 11 वाजलेले असतील... घन्टा कोणी नसणार रोडला... उचलू हिला.. मजा मारू.. आणि नंतर शोभाबाई कड नेऊ.. एक पंचवीस देते बोलतात नव्या पोरीचे... मजा पण आणि पैसा पण... काय बोलतो...??" भिका त्याच्या मित्राला जग्याला सांगत होता." हा.. एकदा ह्या म्हाताऱ्याला कडला लावला कि कामं सोपं." भिकाची री ओढत जग्या बोलला.दोघे शहरातून फिरून मजा करून परत गावी निघाले होते. रेल्वे मध्ये त्यांना हा सत्तारितला वयस्कर माणूस आणि