कोंदण पर्व एक - भाग 5

"सुनेत्रा!"ट्युशनवरून येताना एक मुलाचा आवाज मागून आला. सुनी आणि मी वळलो. मला विश्वासच बसेना. तो सचिन होता." हं!? " सुनीचा एवढाच उच्चार निघाला."जरा काम होतं." तो म्हणाला. माझ्याकडे सपशेल दुर्लक्ष करत तो पूर्णपणे तिच्याकडेच बघत होता." माझ्याकडे? काय? " सुनी शांत स्वरात बोलली." संस्कृतच्या क्लासला जातेस ना तू? मला नाही जायला मिळत. कामे असतात इतर घरातली .. तर.. मला रविवारच्या दिवशी अभ्यासासाठी तुझी क्लासची वही मिळेल का? इतर कोणाची घेतली असती पण तू वर्गात पाहिली असतेस.. म्हणून तूला विचारलं. जमेल का?" एका खेपेत तो म्हणाला."देऊ शकते.. पण परत मला सोमवारी सकाळी वर्गात परत हवी." ती म्हणाली. तिने चक्क होकार दिला