" परत असला प्रकार घडला तर आम्हाला कडक कारवाई करावी लागेल. हुशार आणि गुणी मुलगी म्हणून नाव आहे तुमच्या मुलीचं. तिने असं वागावं असं अपेक्षित नाहीये. त्या मुलाच्या आई वडिलांना झाला प्रकार व्यवस्थितपणे सांगितला आहेच आम्ही. पण तुम्ही सुनेत्राला देखील समजावून सांगा. परत हे क्षम्य नसेल. " प्राचाऱ्यांच्या ऑफिसमध्ये माझे वडील आणि सुनीचे वडील आमच्यासमोर उभे राहून प्राचाऱ्यांची बोलणी खात होते.पहिल्यांदाच तक्रार ऐकण्यासाठी तिच्या बाबांना बोलवण्यात आलं होतं. कारणं सुनीने प्रकारच असा केला होता. तिच्याकडून अशी कृती माझ्या कल्पनेपलीकडची होती... शिवाय.. ते तिने केलं त्याला कारण मी होतो... सुनीने क्षणात माझ्या मनातल्या भीतीचे निराकरण केले होते. माझ्या इतकं महत्वाचं तीला