राम: रामौ रामा: प्रथमारामन रामौ रामान द्वितीया...अशा तर्हेने आमचं संस्कृत अध्ययन सुरु झालं. ती सुभाषिते पाठ करने, रूपं चालवणे. आत्मनेपद, परस्मैपद, उभयपद यातली अंतरे. त्या सुंदर भाषेच व्याकरण बारिकशा क्लिष्ट अशा नक्षीत घडवलेल्या दागिण्यासारखेच क्लिष्ट होते. ते पुस्तक नुसतंच वाचणं म्हणजे सुद्धा जिभेला कवायत होती. तिथं पाठांतर वैगरे डोक्याला ताप होत होता. आणि संस्कृतला पाठांतरशिवाय पर्याय नाही हे माहित होतं. हौसेच रूपांतर जराशा त्रासात झालेलं मी पहिल्यांदा अनुभवत होतो. मला त्याची भीतीच वाटू लागली पहिल्यांदा.मग नेहमीप्रमाणे मी सुनीशी या विषयावर बोललो." सुने संस्कृत घेतलं तर खरं. पण एवढी सोपी, खायची गोष्ट वाटत नाहीये ग. कायच्या काय नियम आहेत त्यां भाषेला.