मी आणि सांगण्यासारखे बरेच काही - 3

(20)
  • 687
  • 180

मागच्या लेखात शाळेच्या मित्राची आठवण सांगितली. तर आता पुन्हा शाळेत जाऊया.आमची शाळा – प्रायव्हेट हायस्कूल. त्या काळात आम्हाला माहित असलेल्या इतर शाळा म्हणजे तवनाप्पा पाटणे हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल आणि ज्या शाळेला आम्ही गंमत म्हणून “महालबाड गद्ध्या मुलींची शाळा” म्हणायचो ती म. ल. गर्ल्स हायस्कूल. सधन कुटुंबातील मुले शिकायची ती सेंट झेवियर हायस्कूल.“प्रायव्हेट हायस्कूल” हे नाव घेताच १९७०–७५ च्या काळातील मुलांना “पिंडरी शेक” आठवतो. पी.टी.चे सर शाळेत उशिरा येणाऱ्या मुलांच्या पायावर पट्ट्या मारत. त्यामुळे प्रार्थना सुरू होण्यापूर्वीच शाळेत पोहोचण्याचा मुलांचा आटापिटा असे. त्या वेळी पालक मुलाला मारले तरी क्वचितच तक्रार करत.आमचे इतिहासाचे सर उत्तम अभिनय करायचे. त्यांनी म्हणून दाखवलेले “ला इलाह…”