सायको

    सायकोBy Sanjay Kamble            शहरापासून थोडं दूर आपलं पॅसेंजर सोडून शेखरन पुन्हा आपली टॅक्सी शहराच्या दिशेने वळवली. ***रात्रीची वेळ, ओस पडलेला रस्ता, त्यातच मंद सुटलेला वारा आणि भुरभुरणारा पाऊस एकंदरीत छान वातावरण होतं.. दिवसभर चांगली कमाई झाल्याने आता घरचा रस्ता धरला असला तरी जाताजाता एखादं भाडं मिळालं तरी नकारायच नाही या विचारात अगदी सामान्य वेगात टॅक्सी चालवत होता..शहर आणि आजुबाजुच्या परिसराला जोडणा-या नदीच्या पुलावरून जात असताना हेडलाईटच्या प्रकाशात पुलाशेजारी एका बाजूला त्याला एक तरुणी एका जाड बैगेसोबत काहीतरी करत असल्याच लक्षात आल. जमीनीवर ठेवलेली ती बॅग पुलावरून खाली नदीच्या पाण्यात फेकायच्या विचारात होती की वर खेचत