इलेक्शन ड्युटी पुस्तकाविषयी इलेक्शन ड्युटी नावाची पुस्तक वाचकांसमोर ठेवतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक लिहिण्याची प्रेरणा दोन भगीनींची. त्या दोन भगीनींची देण आहे ही पुस्तक. तसं पाहिल्यास मी बऱ्याच निवडणुकीच्या ड्युट्या केल्या. तशी मी एकशे सतरा पुस्तके लिहिली. परंतु इलेक्शनवर आधारीत पुस्तक लिहिली नव्हती. यावेळेस महानगरपालिकेचं इलेक्शन होतं. त्यात आम्ही चार लोकं इलेक्शन ड्युटीवर लागलेलो होतो. त्यात माझा परीचय प्रेसायडींग साहेबांनी संबंधीत इलेक्शनला लागलेल्या भगीनींना दिला की सर पुस्तके लिहितात. कारण प्रेसायडींग साहेब मला ओळखत होते. तेव्हा त्या म्हणाल्या की सर, आपल्या या ड्युटीवर आधारीत आपण पुस्तक लिहावी. मग काय, मी ठरवलं की त्यावर आधारीत पुस्तक लिहायची. त्यानंतर