जीवन म्हणजे एक रंगीण प्रवास आहे. त्यामुळे जीवनात चढ उतार तर येणारचं ना ! कधी यश तर कधी अपयश , कधी आनंद तर कधी दुःख... कधी उजेड तर कधी अंधार.......या सर्व छोट्या छोट्या गोष्टीनेच तर आपलं जीवन सजलं आहे....आपण नेहमी म्हणतो मला न जीवनात खूप मोठ व्हायचंय.... खूप यशस्वी व्हायचंय.....! पण मला सांगा.....जीवनात खूप मोठं व्हायचंय, यशस्वी व्हायचंय म्हणजे नेमकं काय? जीवनात यशस्वी व्हायचं आहे म्हटल्याने जर व्यक्ती यशस्वी झाला असता ....तर जे मेहनतीने मिळतेय त्याच काही मौल्य च राहील नसत..... जे मिळवण्यासाठी आपण दिवस रात्र परिश्रम घेतो ,त्याला तर काही महत्वचं उरल नसत...... मनुष्य हा खूप चपळ आणि हुशार प्राणी