सहा महिने - 4

रीता खाली आली. आहील्या बाई डायनिंग टेबलवर बसून नाश्ता करत होत्या. त्यांना बघून तिला थोड धडकीच भरली पण तिला ही भूक लागलेली. मग खाली तर यावाच लागणार होत ती खाली आली. अहिल्या बाईंनी एक कटाक्ष तिच्या कडे टाकला. तशी  रीता थोडी घाबरली. पण मग लगेच त्यांचा फोन वाजला तास त्या फोन घेऊन बाहेर निघून गेल्या. रीता ला थोड हायस वाटलं. ती पटकन येऊन किचन मध्ये गेली.              रामू काका किचन मध्ये जेवणाची तयारी करत होते. तिला बघून त्यानी विचारलं बाई साहेब काही पाहिजे का तुम्हाला? मी देतो मला सांगा... रीता म्हणाली हो रामू काका भूक तर