मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 15

पान १५ आता आमचे शाळेचे दिवस बऱ्यापैकी चालले होते. म्हणजे शाळा, क्लासेस, अभ्यास, उपक्रम हे तर नेहमी चालू असायच. बऱ्यापैकी होस्टेल मध्ये पण, मन रमत होत. पण कधी कधी अशी वेळ यायची. जेव्हा आपल्या घराची, आपल्या माणसांची गरज असते आपल्याला आधारासाठी, ती नव्हती कधी. वेळेप्रमाणे परिस्थितीत माणूस मिसळून जातो. पाण्याच्या प्रवाहासारखा. इच्छा नसली तरी पुढे जात राहतो. कारण, थांबू शकत नाही आपण. आयुष्याच्या प्रवासात माणस येत जात असतात. आपणही घड्याळ्याच्या काट्याप्रमाणे पुढे ढकलत जातो. पण एक धागा मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी मागे सुटलेला असतो, आपल्याही नकळत.जेव्हा आपल्याला तो प्रवास आठवतो. अचानक मन पूर्ण त्या वेळात पुन्हा जात. त्या वेळी नको असलेला