एक निरोप असाही... - 6

खरेतर झाले असे की भूजएअरबेसवर असलेल्या indra-II या रडारने भारताच्या हद्दीत आलेल्या पाकिस्तानच्या ६ जेट्स ना पकडले. इंद्रा -II हे प्रामुख्याने जमिनीच्या जवळून येणाऱ्या विमानांना पकडण्यासाठी वापरले जाते. ते जुन्या पिढीचे रडार आहे. सीमेवर तैनात असणाऱ्या इंद्रा -II ने सुरवातीला सिग्नल दिले की समोरून येणारी विमाने 'मिराज' आहेत कारण शत्रूच्या त्यांच्या विमानाची उंची आणि वेग हा मिराजसारखा होता. इंद्रा -II च्या डेटावर विश्वास ठेवून भारताने आधी तेजसला उड्डाणाची परवानगी दिली. तिन्ही तेजस आपल्या इंजिनचा आवाज करत होती जशी काय ते गुरगुरत आहेत आणि डरकाळी फोडून मिराजवर तुटून पडणार आहेत.तिन्ही पायलटच्या कानात आवाज घुमला.ATC : "All units, this is Hercules. Mission 'Mirage