सुमित आणि कंपनीचा शोध घेणाऱ्या मिग २१ बायसन घेऊन गेलेल्या स्कोड्रॅन लीडर अजितला बेपत्ता होऊन बराच वेळ झाला होता. त्यामुळे त्याला शोधायला फ्लाईट लेफ्टनंट संजीव आपले मिग २१ बायसन घेऊन निघाले होते. मिग २१ बायसन हे मूळ रशियन बनावटीचे मिग २१ लढाऊ विमान आहे. त्याच्यामध्ये योग्य ते बदल करून जसे इंजिन, रडार आणि शस्त्रास्त्रे यांमध्ये बदल करून त्यांना बायसन आहे नाव दिले गेले. लेफ्टनंट संजीव उड्डाण घेऊन थोडाच वेळ झाला होता आणि ते AFATC ला परिस्थिती सांगत होते. त्यामुळे एअरबेसवर सुरू असलेली मीटिंग रद्द करून पायलट आणि AFATC चे संभाषण मीटिंग रुममध्ये ऐकवायला सुरुवात केली. ले. संजीव : "Egle eye, this is falcon.