मी आणि सांगण्यासारखे बरेच काही - 2

मी आणि सांगण्यासारखे बरेच काही.तुम्ही म्हणाल हे काय शिर्षक आहे तर त्याचे असे आहे की, आपल्याकडे जुन्या आठवणी असतात, भुतकाळातील घटना किंवा आता घडत असलेल्या घटनांबद्दल आपल्याकडे सांगण्यासारखे असते पण आपण व्यक्त होत नाही. हे व्यक्त होणे महत्वपूर्ण असते. संवाद साधणे हे नात्यात देखील महत्वाचे आहे , हल्ली संवाद कमी झाला आहे. मैत्री का तुटते, विवाह का टिकत नाहीत तर संवादाचा अभाव. असो. आज महाद्वार रोडवर गेलो होतो. तिथे फडकेंचे होमिओपाथी औषधाचे दुकान आहे तिथे पोचलो आणि एकदम आठवले कोल्हापुरातील पहीला मोठा वडा ज्याला आता जंबो वडा म्हणतात तो वाईकरांचा वडा दोन रुपयात इथेच मिळत असे पण आता वाईकरांचा मागमुस नाही. आताच्या कुणाला