अध्याय - १०मागील भागात -अहेली खाली येते, आणि येऊन त्रिशानसमोर उभी राहते. त्रिशान हळूच आपले डोळे उघडतो, आणि अहेलीला वरून खालीपर्यंत स्कॅन करतो.अहेलीने हिरव्या-लाल रंगाची साडी नेसलेली होती, ज्याचा पदर फिरवून कंबरेच्या एका बाजूला अडकवलेला होता. केसांचा मॅसी बन केलेला होता, ज्याच्या काही बटा अहेलीच्या चेहऱ्याला स्पर्श करत होत्या. कपाळाच्या मधोमध भरलेला लांब, गडद लाल रंगाचा सिंदूर, कपाळावर छोटीशी लाल बिंदी, नाकात सोन्याची छोटीशी नथ, हातात चूड्या, पायात पैंजण, कानात छोटे-छोटे सोन्याचे कानातले होते. एकंदरीत अहेली साध्या सोज्वळपणात