इतक्यात भारतीय आर्मीचा तो भलामोठा ट्रक हॉलच्या गेटवर येऊन थांबला. काळया गडद हिरव्या रंगाचा ती टाटा एलपीटीए 715/4x4 ट्रक पाहिल्यावर धडकी भरावी असा होता. आर्मीचा ट्रक असल्याने त्याच्यासाठी गेट लगेच उघडला गेला. जिथून त्याच्या बहिणीची डोली आता आलेली अगदी तिथेच येऊन तो ट्रक थांबला. ह्याचे लक्ष नव्हते पण जान्हवीने तो ट्रक पाहताच त्याचा हात धरला. तो मात्र विधीत गुंग होता. बहिणीने सुद्धा ट्रक पाहिला होता. त्यातून २ आर्मी ऑफिसर्स उतरून हातात एक कागद घेऊन स्टेजच्या दिशेने येऊ लागले. बहीण समजून गेली की हा आपला भाऊ युनिफॉर्म का घेऊन आलाय. तिने पटकन त्याचा हात पकडला आणि बोलली."दादा.""काय झालं?"तिने फक्त डोळ्याने खुणवून सांगितले. त्याने