अनुबंध बंधनाचे. - भाग 51

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५१ )इकडे वैष्णवीचा दादा पण घरी येताना पेढे घेऊनच आलेला होता. घरात वैष्णवी आणि आई त्याचीच वाट पहात असतात. दादा तो पेढ्याचा बॉक्स खोलून त्यातील एक पेढा घेऊन वैष्णवीला भरवत बोलतो.दादा : अभिनंदन बहिणाबाई तुमच्या लग्नाची बोलणी करून आलोय मी, आता तरी खुश. वैष्णवीला तो पेढा खात खात रडायला येतं, ती रडत रडत तशीच दादाला मिठी मारते. दादा : अरे...! आता रडायला काय झालं...! तुझ्या पसंतीनेच झालं आहे ना...! आता पुढे नीट रहा म्हणजे झालं...!ती मागे वळून आईला मिठी मारते. तिला खुप आनंद पण झाला होता, आणि रडायला पण येत होतं. तिची आई तिचे डोळे पुसत तिला बोलते.आई : रडु