५३. टेन म्हणाला की, तुमच्याकडचे लोक चालत्या गाडीची खिडकी उघडून रस्त्यावर रॅपर्स, साली, बाटल्या वगैरे का फेकतात? इथे कचराकुंड्या नाहीत का? गाडी चालवताना आगोष मोठ्याने हसला. कारण टेनने फक्त ते बोलूनच दाखवले नव्हते, तर त्याने खिडकी उघडून लोक कसे कचरा फेकतात, याचे नाट्यीकरणही केले होते. आणि असे करताना अचानक टेनचे बोट काचेवर दाबले गेले. तो वेदनेने 'आह' करत ओरडला. आगोश प्रतिक्षिप्त क्रियेने हसला, पण लगेचच त्याने स्वतःला सावरले. त्याला आठवले की त्याच्या शेजारी बसलेली व्यक्ती त्याचा खोडकर मित्र नाही, तर एक गंभीर परदेशी पाहुणा आहे. आणि तो पाहुणा योग्य आणि गंभीर गोष्ट बोलत होता. त्याने टेनला विचारले - तुला लागले