रुधिरारंभ - 4

अध्याय ४-------------विश्वासघाताचा चेहरा --------------------------गुहेतील वातावरण थंड आणि कुबट होते. जळणाऱ्या मेणबत्त्यांच्या मंद प्रकाशात वेदीवरची सोनल आणि तिच्यासमोर उभा असलेला काळी झगा घातलेला माणूस अस्पष्ट दिसत होता. आदित्यच्या पिस्तुलाची नळी त्या अज्ञात माणसाकडे रोखलेली होती.“हात वर कर! सोनलला सोड!” आदित्यच्या आवाजात तीव्रता होती, पण त्याचा श्वास अनियमित झाला होता.तो माणूस हळूच वळला. त्याच्या रक्ताने माखलेल्या चेहऱ्यावरचे भयंकर जखमा मेणबत्त्यांच्या प्रकाशात अधिक क्रूर दिसत होते. त्याचे डोळे मोठे, पांढरेशुभ्र आणि निर्जीव होते, जणू कोणीतरी त्याच्यातून आत्म्याचा अंश काढून घेतला होता.आदित्यला क्षणभर त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. त्याच्या हातातली पिस्तूल थरथरली, पण त्याने स्वतःला सावरले. आदित्यला त्याला पाहताच एक तीव्र धक्का बसला. कारण तो