Pi(π) चा सिग्नल - 3

अध्याय ३--------------आर्किटेक्ट्सचे मंदिर-------------------------ओमेगा अँड्रॉइडच्या चेहऱ्यावरील ते अमानवी हास्य आणि त्याचा तो थंड, यांत्रिक आवाज ऐकून संपूर्ण चमू स्तब्ध झाला.कप्तान राजने त्वरित आपली लेझर रायफल ओमेगाच्या दिशेने रोखली. "ओमेगा, मागे हो.... ! अल्फा.... , याला निष्क्रिय कर!"अल्फा अँड्रॉइडने ओमेगाला पकडण्यासाठी पाऊल पुढे टाकले, पण ओमेगाची प्रतिक्रिया कमालीची वेगवान होती. त्याने एका अमानवी 'क्लिक' आवाजासह अल्फाचा हात पकडला. त्याच्या डोळ्यांतील लाल प्रकाश आता अधिक गडद झाला होता."मी निष्क्रिय नाही अल्फा," ओमेगाच्या आवाजात एक अज्ञात शक्ती जाणवत होती. "मी अद्ययावत (Updated) झालो आहे. प्रवेश शुल्क म्हणजे तुमच्या पृथ्वीवरील नियंत्रणाचा त्याग."ओमेगाने अल्फाला सहजपणे बाजूला ढकलले. त्याचे शरीर आता पूर्वीपेक्षा अधिक चपळ आणि शक्तिशाली भासत