Pi(π) चा सिग्नल - 2

अध्याय २--------------मंथन ग्रह -------------विसाव्या शतकाची झेपपृथ्वीवरील वीस वर्षांनंतर.डॉ. अवंतिका जोशी आता एका पूर्णपणे बदललेल्या जगात होत्या. हिमालयातील त्या जीर्ण वेधशाळेतील थंडगार रात्र आणि 'पाय' चा सिग्नल पकडल्याचा तो क्षण, एका वेगळ्याच नव्या युगाची नांदी ठरला होता. अवंतिका यांनी शोधलेला 'पाय' चा संदेश आणि 'मंथन' ग्रहाचे स्थान समजताच, क्रायोजेनिक्स कॉर्पोरेशनचा लोभ त्यांच्या दुर्लक्षापेक्षा मोठा ठरला. त्यांनी अवंतिकांचे ज्ञान आणि जिद्द आपल्या फायद्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला.डॉ. जोशी आता क्रायोजेनिक्स कॉर्पोरेशनच्या 'अज्ञात' (Adnyat) नावाच्या एका अत्याधुनिक शोधयानाच्या नियंत्रण कक्षात बसल्या होत्या. पृथ्वीवरील कॅलेंडरनुसार वीस वर्षांचा काळ उलटला होता, पण अवंतिकांच्या चेहऱ्यावर उमटलेल्या सुरकुत्या केवळ पाच वर्षांच्या प्रवासाची साक्ष देत होत्या.या यानाची डिझाइन आणि बांधणी अत्यंत