एक मोठ्या शहरात सुंदरा नावाची एक मुलगी होती, जिला स्वतःच्या रूपाचा खूप गर्व होता. तिला असे वाटायचे की तिचे रूप खूप आकर्षक आहे. ती रोज स्वतःला आरशात पाहून म्हणायची, “मीच माझ्या रूपाची राणी आहे.”पण एक दिवस तिने अशी एक परिस्थिती पाहिली, ज्यामुळे तिच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. सुंदरा शहरात राहत होती, तर तिचे आजी-आजोबा गावात राहत होते. एक दिवस तिच्या आजी-आजोबांनी तिला गावात येण्याचा संदेश दिला.सुंदरा पहिल्यांदाच गावी गेली होती. गावात गेल्यावर तिला मनमंदिरा नावाची एक मुलगी भेटली, जिला पोलिओ होता. मनमंदिरा खूप गरीब होती; पण तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव आणि तिचे हसमुख सौंदर्य वेगळेच होते.तेव्हा सुंदराने मनमंदिराला पाहून विचारले,“तू