हडळ

  • 144
  • 51

कथेचा उद्देश फक्त मनोरंजन आहे . कोणत्याही अंधश्रद्धेला प्रोत्साहन देण्याचा माझा कोणताच हेतू नाही.कथेत भीती मांडण्याचा प्रयत्न केला आहे, त्यापलेकडे काहीही नाही...धन्यवाद  कार हलकासा आवाज करत रस्ता कापत होती . अवतीभोवती दाट अंधार दुतर्फा झाडी आणि हा घाट....रातकिड्यांचे कर्कश ओरडणे कान फाडत होते व अंधारात हलकेसे धुके खेळत होते . उतारा लागला आणि कार सपकन् घोंगावत पुढे निघाली . धुके हळूच समोरून निघून गेले तोच , एक स्त्री आकृती अचानक कारसमोर उभी ठाकली .... कार चालकाने आपले हात यांत्रिकपणे फिरवले आणि गाडी वेगात समोरील मोठ्या दगडाच्या दिशेने निघून गेली .समोर एक खड्डा होता आणि गाडीची चाके त्यात पडताच