२८. आर्यनच्या अंगावर शहारे आले. त्याला खूप घाम फुटला होता. तो उठून बसला आणि आजूबाजूला पाहू लागला. त्याने आपल्या मोबाईलमध्ये वेळ पाहिली. रात्रीचे पावणे तीन वाजले होते. आजूबाजूला पूर्ण शांतता होती. फाईल त्याच्या हातातून निसटून खाली पडली होती आणि तिची पाने फडफडली होती व आता शांत झाली होती. सुदैवाने कोणताही कागद हलला नव्हता किंवा फाटला नव्हता. सावरण्यासाठी त्याला दोन-चार मिनिटे लागली. मध्यरात्रीनंतरच्या या वेळी, त्याच्या मनातील घालमेल कमी करण्यासाठी आर्यनच्या आजूबाजूला कोणीही नव्हते, ज्याच्याशी तो बोलू शकेल. त्याने पुन्हा तीच फाईल उचलली आणि तिची पाने उलटायला सुरुवात केली. खरं तर, ही फाईल देताना डॉक्टरने हेही सांगितले होते की, हा रुग्णाचा