आज ऑफिस मध्ये एक महत्वाची मिटिंग होती.त्याकारता तिची सकाळ पासून घाई सुरु होती. अगोदरच सकाळी उठायला झालेल उशीर त्यात ऑफिस ला जायला झालेलं लेट.. सकाळी सकाळी वैतागली ती. आई.. Ssssss... आई.. Sssss नाष्टा रेडी केलंय मी त्याला करायला सांग तुही करून घे. मी निघतेय. ती पायात चप्पल घालत म्हणाली. अग तु तरी नाष्टा करून घे. आई तिच्या पाठी दरवाजा जवळ येत म्हणाली आई नको अगोदरच लेट झालंय. मी ऑफिस मध्ये करेन नाष्टा. ती म्हणाली आणि धावत निघाली. ही पोरगी ना... आई घरात येत म्हणाल्या.अर्ध्या तासाने ती तिच्या ऑफिस मध्ये पोहचली. लगेंच आपली बॅग आपल्या डेस्क वर ठेवली आणि आपली डायरी घेऊन बॉस