खडकातलो झरोउगवती लाल झाली तशी पाखरा किलबिलाट करूक लागली. गार वारो भिरभिराक लागलो.सोबतीक फुलांचोवास परमळाक लागलो.उगवतीकडे शुक्राची चांदणी चमका होती.मालग्या सुतारनीच्या कोंब्यान कुकूच कू केल्यान तसा सुगंधा गवंडी धडपडान उठला.तोंडार पाणी मारून भायर इला. खांद्यार टॉवेल टाकून ओसरीर ठेयलेली हडगी उचलून दर्याच्या दिशेनं चलाक लागला." शिरा पडो व्हरान, फटफटला तरी आज जाग येवक नाय."सुगंधा पुटपुटला.गारवो जाणावलो तसो तिना डोक्यावरसून पदर गुंडाळून घेतल्यान.मागे वळानं तिना आपल्या घराकडे बघलेन.तीच्या डोळ्यांन पाणी इला.' देवा माझ्या घराक कोणाची तरी नजार लागलीसा...ईडा पीडा टळांदे रे देवा .' सुगंधा मनातल्या मनात पुटपुटला.सुगंधा ' झापाच्या वाडीत ' रवा होता.थयसली बरीचश्या घरांची छप्परा माडांच्या झापांची होती.दर्यावर तुफान इला