न सांगितलेल्या गोष्टी - 3

दुसऱ्या दिवशी दुपारी मी मुंबई सोडली.ट्रेन हळूहळू स्टेशन सोडत होती. प्लॅटफॉर्म मागे सरकत होता, आणि त्या गर्दीत तिचा चेहरा शोधायचा मोह मी मुद्दाम टाळला.कारण काही भेटी निरोपासाठी नसतात, त्या फक्त मनात जागा करून जातात.खिडकीजवळ बसून मी बाहेर पाहत होतो. शहर बदलत होतं, इमारती कमी होत होत्या, आणि मन मात्र पहिल्यांदाच काही प्रश्न सोडून देत होतं.फोन हातात होता. तिचा मेसेज येईल अशी अपेक्षा नव्हती. आणि आला तरी, त्यावर काय उत्तर द्यायचं हे ठरलेलं नव्हतं.ट्रेन वेगात होती, पण आत कुठेतरी मी स्थिर होतो.तीन दिवस गेले.आमच्यात काहीच संवाद नव्हता. ना “काय करतेयस?” ना “पोहचलास का?” ना काही स्पष्टीकरण.आणि तरीही ते silence रिकामं नव्हतं.