ही गोष्ट आहे तुझ्या अनंताच्या प्रवासाची तुझा वाढदिवस होता 31ऑगस्ट ..खुप छान साजरा झाला..खुप दिवस व्हाईट आर्मीला देणगी द्यायचे मनात होते ती सकाळीच देऊन आलो काही कारणाने गावात त्या दिवशी खूप गर्दी होती म्हणून आपल्याच भागात थोडे लांब असलेल्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो भरपूर भाज्या असलेले ते जेवण खूप आवडले होते तुला तिथेच एक जुने मित्र भेटले फोटो वगैरे झाले..जवळ जवळ सप्टेंबर तिसऱ्या आठवड्या पासून तुला बारीक त्रास होत होताच डोके दुखी असह्य सुरू झाली होती एका डॉक्टर मित्रांना दाखवले त्यांनी कॅटरोल गोळी घेऊन पहा असा सल्ला दिला ती पण सारखी घेऊन effect कमी होऊ लागला मात्र आपले सकाळचे फिरणे योगासने वगैरे रूटीन छान सुरू होते जेवण पण छान होते नंतर दात