देवी या पुस्तकाविषयी देवी....... अर्थात ती देवी नाही की जी चमत्कार करते. ती देवी नाही की जी शस्र बाळगते. देवी आपण तिलाच म्हणतो की जी देवी परीवर्तन करते माणसाच्या जीवनात. कोणती देवी शस्रानं परीवर्तन करते तर कोणती देवी चमत्कारानं परीवर्तन करीत असते. देवी ही माझी इतर साहित्यासारखी महत्वपुर्ण पुस्तक. सम्राट अशोकांचं नाव आपण ऐकलं असेलच. ज्यांचा इतिहास आज बर्याच प्रमाणात प्रसिद्ध आहे. म्हटलं जातं की सम्राट अशोकांच्या जीवनात कलिंग युद्धानं परीवर्तन झालं. परंतु कोणत्याही स्वरुपाचं परीवर्तन व्हायला काही आधारबिंदू लागतो. त्यात तसा आधार द्यायला कधी कोणी मित्र मिळतात की जे चांगले विचार