#Epiphany Day – 6 जानेवारी##ख्रिश्चन धर्माशी संबंधित##येशू ख्रिस्त देवाचा पुत्र असल्याचे प्रकटीकरण # एके काळी, इस्रायलच्या बेथलेहेम गावात थंडगार रात्र होती. आकाशात असंख्य तारे चमकत होते. त्याच रात्री एक असामान्य तेजस्वी तारा अचानक प्रकट झाला. तो तारा जणू काही लोकांना काहीतरी सांगू पाहत होता.दूर देशांतून आलेले तीन ज्ञानी राजे तो तारा पाहून थांबले नाहीत. “हा साधा तारा नाही,” असे त्यांनी ओळखले. त्यांनी आपली प्रवासाची तयारी केली आणि त्या तार्याच्या मागोमाग निघाले. अनेक दिवसांचा प्रवास केल्यानंतर तो तारा त्यांना एका लहानशा गोठ्याजवळ घेऊन आला.त्या गोठ्यात बाल येशू आपल्या आई मरियमच्या कुशीत झोपलेला होता.