पान १४ ऐका ना ! आमच्या शाळेत खूप वेगवेगळ्या स्पर्धा असायच्या. म्हणजे मी असा कधीच भाग घेतला नव्हता. पण वर्गात जेव्हा बाई मराठीच्या कविता शिकवायच्या. तेव्हा शिकवून झाल्यावर उभं राहून सर्वांना म्हणायला सांगायच्या. कोणालाही उठवून त्या कवितेला चाल म्हणजे एका वेगळ्या गाण्याचा ठेका लावून कविता म्हणायला सांगायच्या. याने कविता एका वेगळ्या पद्धतीने म्हणली जायची, मजा यायची आणि ती कविता लक्षात पण राहायची. मी सुद्धा बाईंनी शिकवलेल्या कविता चाल लावायचे. त्यामुळे, बाईच्या बऱ्यापैकी लक्षात होते. आणि अजूनही आहे. आमच्या मराठी विषयाच्या बाईच नाव नाईक बाई. खूप प्रेमळ आणि चांगला स्वभाव. बाई आम्हाला Hostel च्या मुलींना जास्त जीव लावायच्या. कारण, आम्हाला आमच्या आईची आठवण येऊ नये. बाई म्हणायच्या, 'तुम्हाला काही वाटल तर,