जितवणीपळाले- भाग ०9 अंडर ग्राऊण्ड टाकीचे खोदकाम सुरू झाले . चाळीस फूट खोदकाम झाल्यावर बारीक बारीक झरे लागले. आश्चर्यम्हणजे ते गोड्या पाण्याचे झरे होते.जितवण्याचे पाणी त्यात आणून सोडले की गावाचा पाण्याचा प्रश्न शाश्वत स्वरुपात सुटणार म्हणून गावकरी खुशहोते. टाकीची खोदाई झाल्यावर कडेला कॉन्क्रिटच्या भिंती ओतण्यात आल्या. दरम्याने जलकुंभाचा बेस बांधून होत आला. पाऊसकाळ नजिक आल्यामुळे काम थांबले. पावसाळ्यात अंडर ग्राऊण्ड टाकीत साधारण पुरुषभर पाणी साठलेले होते. पुढच्या दसऱ्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात झाली. दोन महिन्यात जलकुंभ पुरा झाला नी गावभर पाईप लाईन टाकायची सुरुवात झाली. दरम्याने मंत्रालय पातळीवरून उच्च्स्तरीय समिती रिव्ह्यू घ्यायला आली. अंडर ग्राऊण्ड टाकीत मूळ जलस्त्रोतातले पाणी सोडल्यावर तीस तासानी सरफेस पर्यंत वॉटर लेव्हल आली तर