कालचक्र - खंड 1 - भाग 2

  • 822
  • 303

दुसरा दिवस उजाडला. तयारी करून नऊच्या सुमारास आदित्य ऑफिसला निघतो. ऑफिसला पोहचेपर्यंत वेळ झाल्याने नेहमीसारखे आपले काम करत सगळे आपापल्या जागी बसलेले दिसतात. ऑफिसमध्ये प्रीतीला जॉईन होऊन काहीच दिवस झाले होते. सगळ्यांना आदित्य आणि प्रीतीबद्दल जाणीव होतीच. पुढे लग्नच करणार आहोत. इथवर साऱ्यांना सांगून झालं होतं. सगळं काही सुरळीत सुरू असतं. दुपारी एकच्या दरम्यान लंच ब्रेक होतो. आदित्य आणि त्याचे सहकारी एकत्र जेवायला बसतात. आदित्य आपल्या शर्टच्या दोन्ही बाह्या वर करून जेवायला सुरुवात करतोच की जेवताना अचानक हातावरच्या टॅटू सदृश्य व्रणावर प्रीतीची नजर पडली. तो पाहून प्रीती आदित्यला म्हणते.प्रीती: अरे वा !!! आदित्य, मस्त गोंदलय रे.आपल्या हाताकडे प्रीतीची नजर गेलेली