जितवणीपळाले- भाग ०८ त्या दिवशी पाच वाजे पर्यंत जेवणावळी झडल्या. बरेच अन्न उरले होते. पण पंक्ती उठल्यावर गावकरी आणि वडारा-बेलदारानी उरलेले सगळे अन्न भरून नेले, अगदी कणही वाया गेला नाही. या निमित्ताने बाबाजीराव आणि पंचायत समितीचे सभापती अनंतराव धुरी यांची ख्याती तालुकाभर सर्वतोमुखी झाली. बाबाजीरावांचे घोरणही फळाला आले आणि राजकीय पटावर बाळासाहेबांचे वजन वाढले.लगतच्या सार्वत्रिक निवडणुकीत अनंतरावाना आमदारकीचे तिकिट मिळालेनी ते बहुमताने निवडूनही आले. त्यानंतर बाळासाहेबांकडे मुख्यमंत्रीदाची सुत्रं गेली नी बाबाजीरावांची वट वाढली.अगदी ग्राम पंचायत पातळी पर्यंत सत्तेची समिकरणं बदलली. बाबाजीरावानी अनंतरावांच्या ऐवजी रावाच्या वाडीतल्या धकलोजी मर्गजाला पंचायत समितीचा सभापती केला. धकलोजी मर्गजाला गाववाले अचागणी मर्गज म्हणून संबोधित,