पडद्याआडचे सूत्रधार - 6 - बंडखोरीचा अंत आणि MS 2 ने केलेले शोधकार्य

पॉवर बंद केल्यावर सगळी सिस्टम बंद झाली. त्यामुळे थ्रस्टर सुद्धा बंद झाले. उडायला लागणारी ऊर्जा, शक्ती सगळ शून्य. अवकाशात उडताना तिकडे निर्वात पोकळी होती तिथे सगळ बंद केल्यावर सुद्धा यानं आपल्या वेगाने पुढे सरकत होते कारण कसलाच अवरोध नसायचा. हाच विचार करून या पाच तबकड्यांनी पॉवर बंद केल्या. पण झाले भलतेच. निर्वात पोकळीत कोणताही फोर्स नसतो पण या तबकड्या आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेत होत्या. काही कळायच्या आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीने त्यांना खेचून घेतले. काही वेळातच त्या चारही तबकड्या पृथ्वीवर चार ठिकाणी कोसळल्या. जी पाचवी तबकडी मदर स्पेसशिपच्या ताब्यात होती ती आता हळूहळू मदर स्पेसशिपच्या बरोबर खाली आली, आली नाही आणली गेली,