जितवण पळाले- भाग 7

  • 450
  • 1
  • 126

             जितवणी पळाले- भाग ०७                 थोड्याच वेळात  कसलातरी पाला  घेवून नाऊ आला. त्याने मागारणीला हाक मारली. सुपात राख   घेवूनती   आली.   राखेच  सूप  बाजुला ठेवला. मग  तिने पाट्यावर ठेचून ठेचून  गंधासारखा  थलक झाल्यावर तो चौपदरी  फडक्यातून गाळून  त्यातला निम्मे   दंशकरणीला पाजला. “ह्ये बग बया, आता  वांतीची भावना आली की   सुपातल्या   राखाडीवर  वोक......”असं सांगून  फडक्यातला चोथा बाईचा तळहाताना  नी तळपायाना  चोळू लागली. काही वेळात बेलदारणीला  जोराची वांती झाली.    नाऊने सूप बाहेर उजेडाला न्हेवून परीक्षा केली. “आजून वाईच उग्रम हाये…..”  उरलेले औषध पाजायला सांगितले. ते पाजल्यावर बाईला पुन्हा उलटी झाली तेंव्हा....“आता  ईख़ उतारलें ......  हिला वाईच  पाणी पाजा. आता  हप्ताभर   आंबाट तिकाट  वशाट काय