बेलदारांकडे नेमस्त हांडी भांडी. दिवसाडी पुरेल इतकं पाणी न्यायला लागणारी आयदणं नव्हती. पाणी संपलं की तळावर माघारी जावून पाणी आणण्यात घंटाभर सहज मोडायचा. यावर काय तोडगा काढायचा ? याचा विचार करीत असता कोणाला तरी विहीर मारायची युक्ती सुचली. नाहीतरी भर घालायला डेगा खणायला लागत असे. तेच खणकाम एका जाग्याला केलं तर सहज दहा वीस हात डबरा मारता येईल , हा विचार सगळ्यानाच पटला.त्या दिवशी मल्लूचा पाव्हणा आलेला होता. तो पाणक्या आहे हे कळल्यावर बेलदारानी त्याला गळ घातली, दुसरे दिवशी तो काम सुरू होते त्या जाग्याला आला. तो दोन हातांची ओंजळ करून त्यावर नारळ ठेवून त्या