अनुबंध बंधनाचे. - भाग 50

अनुबंध बंधनाचे.....( भाग ५० )सकाळी दादा उठल्यावर ती पुन्हा त्याला बोलते...वैष्णवी : दादा प्लीज... मला त्या माणसाशी लग्न नाही करायचं आहे. मी तुमच्या पाया पडते...दादा : तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का...? आमचा निर्णय झालेला आहे. तुला हे लग्न करावच लागेल. वैष्णवी : मी मरून जाईन पण अशा माणसाशी लग्न करणार नाही.आई : बाय... असं नको ग बोलू...वैष्णवी : मग काय करू...! तुम्ही कोणीच माझा विचार करत नाही. दादा : अजून किती त्रास देणार आहेस आम्हाला, झालं तेवढं पुरेसं नाही का..? अजुन काय बाकी आहे का...?वैष्णवी : दादा फक्त यावेळी समजून घे प्लीज. दादा : मग अजुन किती वर्ष थांबायचं...? लोकं आम्हाला बोलतात.वैष्णवी