जितवणी पळाले- भाग ० ५रिवाजअसा होता की. सीझनच्या बोलीवर दरठरवून टोळी प्रमुखांशी सौदे केले जात. केलेल्या कामाच्या निम्मे रक्कम हप्त्याला दिली जाई. बोलीप्रमाणे केलेली मुदत भरली की मग त्या त्याटोळीचा हिशोब पुरा भागवला जात असे. प्रत्येक टोळीचा कामाचा उरका भिन्न असे त्यामुळे एखाद्या हप्त्याला कामाचा सरिफा पडत नसे. अशावेळी मिळणारी रक्कम हप्त्याच्या खर्चा साठी पुरी पडणारी नसली की मग टोळीतल्या लोकांचीमुकादमाची हमरातुमरी व्हायची. वडार आले नी गावात कोंबड्या पाळणारे, मासेपागणारे, शेरडं पाळणारे धनगर आणि गावठी दारू विकणारांची चलती सुरू झाली. पूर्वी एकटा जग्या परीट गावठी दारू गाळून ती विकायचा धंदा करी. बेलदारांच्यातबापयांच्या बरोबरीने बायल