लालपरीत भेटलेली आई

"लालपरीत भेटलेली आई"©® - अविनाश भिमराव ढळे - All rights reserved लालपरी…ती फक्त एक बस नाही.ती चालती-बोलती कहाणी आहे.जुन्या सीट्सवर बसलेली थकलेली माणसं, खिडकीबाहेर धावणारा काळ आणि आतमध्ये साचलेली असंख्य आयुष्यं. प्रत्येक प्रवासी आपली एक वेदना, एक आशा, एक अपूर्ण कथा घेऊन बसलेला असतो. काही कथा शब्दांत व्यक्त होतात, काही नजरेतून उमटतात, तर काही थेट हृदयात खोलवर रुतून बसतात.त्या दिवशी मी लालपरीत बसलो होतो. प्रवास फार लांबचा नव्हता, पण मनाच्या अंतरावर तो आयुष्यभराचा ठरणार आहे, याची कल्पनाही नव्हती.माझ्या शेजारी एक आज्जी बसलेली होती. अंगावर साधी, झिजलेली साडी; पायात थकलेली चप्पल; हातात एक छोटीशी कापडी पिशवी. चेहरा सुरकुत्यांनी भरलेला, पण त्या सुरकुत्यांत आयुष्यभराच्या